कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीचा प्रारूप आराखडा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासक या त्रिसदस्यीय समितीच्या मान्यतेने निवडणूक आयोगाकडे पाठविण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीची मान्यता घेऊन शुक्रवार दि. ११ रोजी हा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.