पुणे (प्रतिनिधी) : येत्या १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसच यावर लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान कोरोनामुळे प्राध्यापक भरती थांबली होती. ही भरती प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ३  हजार ७४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती होईल.

पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे. तसंच १२१ जागांवरती ग्रंथपाल भरती आणि विद्यापीठांमधील ६५९ जागांवरती अन्य भरती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे, सामंत यांनी ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या घोषणेमुळे प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.