मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे मतदान प्रक्रियेत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी अडीच कोटी रुपये मागितच्या प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात एका लष्करी जवानाला पोलिसांनी अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

“मारुती ढाकणे (४२) असे आरोपीचे नाव असून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.

“आरोपीच्या डोक्यावर कर्ज होतं. हे कर्ज फोडण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली आहे. पण त्याला ईव्हीएमबद्दल काहीच माहिती नाही, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपीने अंबादास दानवे यांचे धाकटे भाऊ राजेंद्र दानवे यांची जवळच्या हॉटेलमध्ये भेट घेतली. अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी झालेल्या चर्चेनंतर दीड कोटी रुपयांचा करार झाला होता, त्याने राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन रक्कम म्हणून १ लाख रुपये घेतले”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मारुती ढाकणे हा सैन्यात हवालदार म्हणून आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात जेवढे एव्हीएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना फोन केला. त्यासाठी अडिच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागण्यात आले. या संदर्भात दानवेंना संशय आणल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले. पुण्यातील गोल्डन हॉटेलमधून मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

आरोपीकडून मदत करण्याचे आश्वासन
अंबादास दानवे यांच्या अडिच कोटींची मागणी करताना आरोपीने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ईव्हिएम हॅक करुन तुम्हाला संभाजीनगरमध्ये पाहिजे तो रिजल्ट मिळवून देऊ, असं आरोपीने अंबादास दानवे यांना सांगितले. त्यानंतर दानवेंनी पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.