कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या नवे आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे सक्रिय प्रशासकीय कामकाजात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी रविवारी विनामास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या या कारवाईच्या दणक्याने प्रशासकीय यंत्रणाही हलली आहे.
रंकाळा चौपाटी परिसरात स्वच्छता मोहिमेच्या काळात कोरोना प्रतिबंधक उपायोजनावरही भर देण्यात आले. सकाळी विनामास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करुन ३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशाच प्रकारे महापालिका पथकाने कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. बलकवडे यांनी दिले.