पुणे ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या लसनिर्मितीसाठी पंतप्रधान मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना दिलेले पाठबळ हे देखील कौतुकास्पद होते. याचीच चित्तथरारक कथा सांगणारा “द व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील नागरिकांसाठी ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचे लोकसहभागातून स्क्रिनिंग आयोजित केले आहे. याचा कोथरुडकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने सर्वांनाच हादरवून सोडले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण आपला जीव मुठीत धरून जगत होते. या महाभयंकर रोगापासून तारण्याचा संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवला, तो आपल्या भारताने ! डॉक्टर्स या विषाणूशी लढा देत असताना शास्त्रज्ञ या विषाणूला नष्ट करणारी लस शोधण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते.

लसनिर्मितीसाठी पंतप्रधान मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना दिलेले पाठबळ हे देखील कौतुकास्पद होते. याचीच चित्तथरारक कथा सांगणारा “द व्हॅक्सिन वॉर” हा सिनेमा आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर तसेच अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.


मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर आणि बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २. ४५ आणि रात्री ९. ३० मिनिटांनी या शो चे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील सिटी प्राईड या सिनेमागृहात हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत तिकीट वाटप ठेवण्यात आले आहे. कर्वेपुतळ्याजवळी चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयात या तिकिटाचे वाटप केले जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.