मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

काश्मिरी ( वृत्तसंस्था ) काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना याना मीर म्हणाल्या, पाकिस्तान चुकीचा प्रचार करत आहे. त्यांनी याचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की, भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये ते पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत. मलाला युसुफझाईचा संदर्भ देत त्या म्हणाल्या… Continue reading मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

धक्कादायक..! बारामुल्ला सेक्टरमध्ये बस कोसळली; 8 ठार

बारामुल्ला ( प्रतिनिधी ) जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील बोनियार येथे बुधवारी एक बस खोल दरीत कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. उरीकडे जाणारे वाहन बुजिथालाजवळ दुपारी रस्त्यापासून खड्ड्यात पडले. वाहन रस्त्यावरून घसरल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. एसएसपी रविंदर पॉल सिंग यांनी सांगितले की, सर्व… Continue reading धक्कादायक..! बारामुल्ला सेक्टरमध्ये बस कोसळली; 8 ठार

कलम 370 प्रकरणात मुस्लिम देशांची उडी; पाकिस्तान ही***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारने हे प्रकरण ओआयसी देशांसमोर मांडले आहे. आता इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीनेही कलम 370 च्या वादात उडी घेतली आहे. OIC ने कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘चिंता’ व्यक्त केली आहे. ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात ओआयसीने म्हटले आहे… Continue reading कलम 370 प्रकरणात मुस्लिम देशांची उडी; पाकिस्तान ही***

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई ! 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू ( वृत्तसंस्था ) गेल्या 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोन चकमक झाली, ज्यामध्ये 6 दहशतवादी मारले गेले. पहिली चकमक 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी कुलगाममध्ये सुरू झाली. यामध्ये पाच दहशतवादी मारले गेले. दुसरी चकमक राजौरी येथे झाली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुरक्षा दलांना कुलगामच्या सामनू भागात दहशतवादी लपल्याची… Continue reading जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई ! 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मूत बीएसएफवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; एक जवान शहीद

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेजवळ (आयबी) पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या बेछूट गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल लाल फाम कीमा जखमी झाले, त्यांनी सांगितले, त्यांना प्रथम स्थानिक… Continue reading जम्मूत बीएसएफवर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; एक जवान शहीद

उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

जम्मु ( वृत्तसंस्था ) लष्कराच्या जवानांनी उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील मछल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना आज गुरुवार दिनांक 26 आक्टोबर रोजी घडली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक उडाली आहे या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे गस्त घालणाऱ्या सैनिकांना घुसखोरी झाल्याचे दिसले यावेळी तातडीने इतर साथीदारांना… Continue reading उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

धक्कादायक..! जम्मुत वरिष्ठ दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याचा साथीदारांवर गोळीबार

जम्मु ( प्रतिनिधी ) जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये एका वरिष्ठ दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याने आपल्याच साथीदारांवर गोळीबार केला. या गोळीबारात काही जवान जखमी झाले असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे जम्मु लष्कर तळावर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) पुढे असलेल्या तळावर लष्कराच्या एका प्रमुखाने गुरुवारी आपल्या सहकारी सैनिकांवर गोळीबार केला… Continue reading धक्कादायक..! जम्मुत वरिष्ठ दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याचा साथीदारांवर गोळीबार

error: Content is protected !!