नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारने हे प्रकरण ओआयसी देशांसमोर मांडले आहे. आता इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीनेही कलम 370 च्या वादात उडी घेतली आहे. OIC ने कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘चिंता’ व्यक्त केली आहे.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात ओआयसीने म्हटले आहे की, ‘ओआयसीचे महासचिव कार्यालय 5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने घेतलेल्या एकतर्फी कारवाईला कायम ठेवत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चिंता व्यक्त करते.

या अंतर्गत जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. ओआयसीने इस्लामिक समिट कॉन्फरन्स आणि ओआयसी परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे ठराव आणि निर्णय देखील शेअर केले. गाझावर काहीही करू न शकलेल्या ओआयसीने काश्मीरच्या लोकांशी एकता व्यक्त करण्याचे नाटक केले.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तान सरकार चक्रावून गेले. पाकिस्तान सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि भारताचे संविधान मान्य करत नाही आणि निर्णय नाकारल्याचे म्हटले होते. त्याचवेळी चीननेही या निर्णयावर आक्षेप घेतला असून भारताने संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार त्याचे निराकरण करावे. पाकिस्तानने हे संपूर्ण प्रकरण संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतही मांडले होते. यावर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.