काश्मिरी ( वृत्तसंस्था ) काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना याना मीर म्हणाल्या, पाकिस्तान चुकीचा प्रचार करत आहे. त्यांनी याचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की, भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये ते पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत.

मलाला युसुफझाईचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, मी मलाला नाही, तिला दहशतवादाच्या भीतीमुळे पाकिस्तान सोडावा लागला. भारत मात्र भयमुक्त आणि सुरक्षित आहे. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. याना मीर लंडनमध्ये ब्रिटीश संसदेने आयोजित केलेल्या ‘रिझोल्यूशन डे’ मध्ये बोलत होत्या.

‘मी मलाला युसूफझाई नाही, कारण मी माझ्या देशात, भारतात स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. माझ्या जन्मभूमीत, काश्मीर, जो भारताचा भाग आहे. मला कधीही पळून जाऊन तुमच्या देशात आश्रय घेण्याची गरज भासणार नाही. मी मलाला युसुफझाई कधीच होणार नाही, पण मलालाला अत्याचारित म्हणवून माझ्या देशाची, माझ्या पुरोगामी मातृभूमीची बदनामी केल्याबद्दल मी आक्षेप घेत आहे.

May be an image of 5 people, the Oval Office and text

मलालाचा उल्लेख करत पाकिस्तानवर हल्ला बोल

याना मीर या श्रीनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार आहेत. त्या पहिल्या काश्मिरी महिला YouTube व्लॉगर आहे ज्या राजकारणावर अहवाल देतात.याना मीर यांचा जन्म 12 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग येथे झाला. त्यांचे आजोबा जम्मू-काश्मीर पोलिसात होते. याना या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या, दहशतवादामुळे हजारो काश्मिरी मातांनी आपले पुत्र गमावले आहेत. माझ्या काश्मिरी समुदायाला शांततेत जगू द्या. धन्यवाद आणि जय हिंद.