कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट), नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान करणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीच्या अनैतिक व्यापारास विरोध म्हणून संपूर्ण देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि संलग्न व्यापारी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात जोरदार निदर्शने करून ई-कॉमर्स कंपनीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.