कोल्हापूर (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतींचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व पाण्यात गेले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याला भरीव नुकसान भरपाई द्वावी, अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.