दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण हा नेहमीच चर्चेत असतो. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पवन कल्याणचं मोठं नाव आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. तो जेवढा सिनेमांममुळे चर्चेत असतो ठेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आज पवन निवडकीदरम्यान केलेल्या एका वक्त्यामुळे चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तो आंध्रप्रदेशमध्ये प्रचार करत आहे. नुकत्याच एका रॅलीदरम्यान त्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख केला. यामुळे पवन कल्याणचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

काय म्हणाला पवन कल्याण..?

पवन म्हणाला, “पैशांसाठी मी कधीच माझ्या मूल्यांशी तडजोड करत नाही”, असं तो म्हणाला. एका जाहिरातीसाठी शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला मिळाली होती, मात्र जनहिताचा विचार करून मी ती नाकारली, असा खुलासा पवन कल्याणने रॅलीमध्ये केला.

पवन कल्याण या रॅलीदरम्यान म्हणाला की, 2000 मध्ये त्याला समजलं की एक सॉफ्ट ड्रिंक लोकांच्या आरोग्यासाठी ठीक नाही. या सॉफ्ट ड्रिंकमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे समजताच त्याची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला. “कोला ब्रँडने मला त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र मी त्यात जराही रस दाखवला नाही. मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मिळाली होती. पण मी माझ्या सिद्धांतांना प्राधान्य दिलं. अशा पद्धतीने पैसे कमावण्यात मला अजिबात रस नाही”, असं तो पुढे म्हणाला.