रांची ( वृत्तंसंस्था ) झारखंडमध्ये ईडीचे छापे सातत्याने सुरू आहेत. आज बुधवार दिनांक 8 मे रोजी झारखंड मंत्रालयातील ग्रामीण विकास विभागाच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरूच आहेत. मंत्री आलमगीर आलम यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव लाल यांच्या कार्यालयात ईडीचा शोध सुरू आहे. ईडीच्या छाप्यावेळी संजीव लाल देखील हजर होते.

मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीचे छापे सुरूच आहेत. बुधवारी झारखंड मंत्रालयातील ग्रामीण विकास विभागाच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. ज्या ठिकाणी ईडीची झडती सुरू आहे, तेथे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचे कार्यालय आहे. ईडीच्या छाप्यावेळी संजीव लाल देखील हजर होता.

ईडीचे अधिकारी ग्रामविकास विभागाच्या सर्व निविदांशी संबंधित कागदपत्रे तपासत आहेत. संजीव लाल यांच्या माध्यमातून झालेली सर्व कामे आणि निकाली काढण्यात आलेल्या फाईल्सची चौकशी करण्यात येत आहे. ग्रामविकास विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. सर्वजण कार्यालयात हजर आहेत. त्याचवेळी ग्रामीण विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर सीआरपीएफचे जवान उपस्थित होते. या कालावधीत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. सध्या ग्रामविकास विभाग पूर्णपणे ईडीच्या ताब्यात असून शोध सुरू आहे.