कोल्हापूर (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा पटेलवाडी गावात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकानं छापा टाकून लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त केला. तर याप्रकरणी आरोपी लक्ष्मीप्रसाद मांजरेकर याला फरार घोषित करण्यात आले आहे.

पटेलवाडी गावात एका काजू फँक्टरी समोरच्या पत्राच्या शेडमध्ये अवैध मद्यसाठा असल्याची माहिती कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या परिसरात छापा टाकून वाहनांसह अवैध मद्यसाठा असा २० लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक पी. आर. पाटील, अ. अ. पाडळकर, दुय्यम निरीक्षक आर. जे. यवलुजे, एस. एस. गोंदकर यांच्यासह पथकानं केली.