कोतोली (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने शेतकरी आंदोलनात गाडी घालून हिंसाचार घडवून आणला होता. या घटनेमुळे देशभरात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे सर्व व्यापाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिला. यावेळी शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख संभाजी जाधव, शिवसेना उपतालुका महिला प्रमुख कोमल तांदळे, स्वप्नील जाधव, कोतोलीचे सरपंच पी. एम. पाटील, एस. डी. पाटील, सज्जन पाटील, शिवसैनिक उपस्थित होते.