दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटील ) करवीर तालुक्यातील दिंडनेर्लीच्या शुक्ला सात्तापा बिडकर हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेमध्ये पॉवरलिफ्टिंगमध्ये 41 किलो वजनी गटात 50 किलो वजन उचलून शुक्लाने रौप्य पदकाला गवसणी घातली आहे.


शुक्ला ही शिवछत्रपती पुरस्कार विजेती आहे. शुक्लाने यापूर्वी अनेक पदकांची कमाई केली आहे. यामुळे कोल्हापूरसह दिंडनेर्ली गावामध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुक्ला हिला मार्गदर्शन शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त श्री विभीषण पाटील. शाहू साखर कारखान्याचे चेअरमन. राजे समरजीतसिंह घाटगे. सारिका सरनाईक. अनिल पवार या सर्वांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.