कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आज (बुधवार) तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील श्री शिवमूर्तीस दुग्धाभिषेक, स्मारकस्थळी पुष्प सजावट व साखर, पेढे वाटप करून करण्यात आले.

या श्रीशिवराज्याभिषेक दिन निमित्ताने ३४८ व्या शिवशकास आज प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी योग्य ती काळजी, ठरावीक धारकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त  श्री शिवप्रतिष्ठानतर्फे सीपीआर रूग्णालयामध्ये जेवणाचे २०० डबे वाटप करण्यात आले.

या वेळी कार्यवाह आशिष लोखंडे, सुमेध पोवार, गणेश जाधव, आशिष सोमवंशी, अवधूत चौगुले, संदेश पोलादे, ओमकार अतिग्रे, प्रसाद बुलबुले, अथर्व कोल्हापुरे आदी धारकरी उपस्थित होते.