कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीचं बिगूल वाजण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी ही हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभीवर आज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा केली आहे
महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आज शिक्कामोर्तब होणार ? अशी चर्चा वेग धरु लागली असताना ही भेट खुप काही सुचित करते. राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांची कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथं घेतलेली भेट लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी लोकसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांबाबत भाष्य करत शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असं म्हटलं आहे.
थोरल्या शाहू राजांचा विचार ते आजही चालवतात
शरद पवार यांनी आज शाहू महाराज छत्रपतीचं कौतुक करत प्रत्यक्ष राजकारणात शाहू महाराजांचा सहभाग नसतो. सामाजिक कामात ते सहभागी असतात. इथं भेटण्यासाठी आमची जी वेळ ठरली होती, त्याला त्यांच्याकडून थोडा विलंब झाला. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं. कारण असं कधी होत नाही. मात्र उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीच्या भेटीसाठी गेले होते. असं आता समजलं याचा अर्थ थोरल्या शाहू राजांचा विचार ते आजही चालवतात असं ही ते म्हणाले त्य़ामुळे शिक्का मोर्तब झालं का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.