पिंपरी (प्रतिनिधी) : होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं ही म्हण ऐकत होतो. पण, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्याचं होत त्याचं नव्हतं कसं झालं आणि ज्याचं नव्हतं त्याचं होतं कसं झालं, हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे, असे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सध्याची लोकशाही फार बदललेली असून ६४ आमदारांचा मुख्यमंत्री होतो. ५४ आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो. ४४ आमदारांचा मंत्री होतो आणि १०५ आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. या लोकशाहीचे उभ्या देशाला दर्शन घडवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा देशातील सत्ताधारी पक्ष धसका घेत आहेत. अशा नेत्यांचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. एखाद्या २५ वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे.