कवठेपिरान ( प्रतिनिधी ) – हिंदकेसरी मारुति माने म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. आजवर त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. मात्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमांतून या स्मारकाचे रेंगाळलेले काम मार्गी लावणाऱ्या युवा नेते धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कवठेपिरान येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते .

पुढे बोलताना ते म्हणाले , उसाच्या एफ आर पी साठी केंद्र सरकारने प्रतिटन २५० रु जाहिर केले आहेत. त्यासाठी कोणाला आंदोलन करण्याची कोणतीही गरज नाही.असे सांगत राजू शेट्टींच्या आंदोलनावर माजी मंत्री सदाभाऊ खोत प्रश्नचिन्ह उपस्थित केले . हिंदकेसरी मारूति माने यांच्या स्मारकासाठी पैलवान भिमराव माने गेले अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळांतही त्याला यश आले नाही . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन होताच धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्याच्या माध्यमांतून तात्काळ ऐशी लाखाचा निधी उपलब्ध करून स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला .

गौरव नायकवडी यांनी मोदींच्या काळांत आणलेल्या विविध कल्याणकारी योजना विषद केल्या. आणि मोदीजी चे हाथ बळकट करण्यासाठी व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी धैर्यशील माने यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

राहूल महाडीक म्हणाले ,दादा हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे.मागच्या निवडणुकीत तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन देणार असे ते म्हणाले होते.त्यानुसार त्यांनी संपूर्ण मतदारसंघात एमआयडीसी , लॉजिस्टिक पार्क मंजूर करून आणले आहे.यामुळे मतदार संघात मोठा विकास होणार आहे. यावेळी पै. भीमराव माने , विक्रम पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते .