पुणे, ( प्रतिनिधी ) : आज पुणे सीए फ्रॅटर्निटीच्या वतीने आयोजित ‘सीए संवाद रोड टू विकसित भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती हत्ती. दरम्यान, विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हा सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक असल्यामुळे सीएच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही या वेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणले, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण सीएंनी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. तसेच व्यापाऱ्यांना अतिशय जाचक ठरलेला एलबीटी कर रद्द करून, व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे सीए वर्गाने समाजाच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होणारे असे प्रश्न निदर्शनास आणून दिले, तर त्यावर सकारात्मक प्रतिसाद देऊ,असे मत व्यक्त केले. तसेच, सीएंनी आपल्या समस्यांसाठी नेहमीच प्रशासनाशी संवाद ठेवला पाहिजे, असे आवाहनही पाटील यांनी केले.‌

या वेळी लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शशिकांत बर्वे, राजेश अग्रवाल, विवेक मठकरी, रेखा धामणकर, शिरीष कुलकर्णी यांच्यासह चार्टर्ड अकाऊंटन्सी क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.