कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. जाणूनबुजून आणि कटकारस्थान रचून ही शाईफेक करण्यात आली आहे. त्या मागचे खरे सूत्रधार लवकरच समोर येतील, असा दावा खासदार महाडिक यांनी केला आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानाचा सोयीस्कर विपर्यास अर्थ काढून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा काही राजकीय संधीसाधू मंडळींचा डाव आहे; मात्र हा डाव यशस्वी होणार नाही. कारण चंद्रकांतदादा पाटील यांच्या मनातील महापुरूषांबद्दल असलेली निष्ठा आणि आदर सर्वांनाच माहित आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले आहे.