राधानगरी ( प्रतिनिधी ) विकसित भारताची संकल्प यात्रा नियोजनाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी राधानगरी येथे नागरिकांशी संवाद साधत केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यासाठी ही यात्रा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.


पुढे बोलताना खासदार महाडिक म्हणाले, या चित्ररथाच्या माध्यमातुन आपला संकल्प विकसित भारताच्या माध्यमातुन राष्ट्रीय महामार्ग, स्टार्टप इंडिया, ऐतिहासिक स्थळाचे पुर्ण जिवन, आदिवासी समुदायासाठी स्नान हक्क आणि संधी, महीला सक्षमिकरणाची सुनिश्चिती

आयुष्यमान भारत, शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती, सामाजिक सुरक्षा , जनधन योजना, उज्वल गॅस योजना, अधुनिक शिक्षण,पर्यावरण व निरंतर विकास याच बरोबर आपला संकल्प विकसित भारताच्या सर्व जनतेसाठी सर्वांगीण विकासाच्या योजना यांची माहिती जिल्हा प्रशासकीय स्तर ते खेड्या पर्यंत सुसंवाद साधणारी असल्याचं ही म्हटलं आहे.

यावेळी राधानगरी ग्रामपंचायतीच्यावतीने लोकनियुक्त सरपंच सविता राजाराम भाटळे, उपसरपंच अरूणा अरविंद पोवार, डि. एस कांबळे व सदस्य यांनी रथयात्रेचे स्वागत केले. या वेळी तहसिदार अनिता देशमुख, राधानगरी पंचायत समितीचे बीपीओ संदिप भंडारी, अरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी राधानगरी तालुक्यातील लाभार्थी, अधिकारी कर्मचारी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.