कोल्हापूर ( प्रतिनिधी ) साळोखेनगर येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (10 डिसेंबर 2023) रोजी ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील गुणवंत विद्यार्थ्याना 50 हजार रुपयांची बक्षिसे मिळणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ऑब्जेक्टीव्ह पद्धतीने होणाऱ्या 100 गुणांच्या या परीक्षेत 50 प्रश्न असतील. यामध्ये प्रामुख्याने एमएचटी-सीईटी च्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सीईटी परीक्षेचा सरावही होणार आहे. तसेच परिक्षेनंतर आयआयटीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून शंका निरसन करण्यासाठीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परीक्षेचा निकाल 31 मार्च रोजी जाहीर होणार आहे. पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे 25 हजार 15 हजार व 10 हजार अशी बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर जाऊन https://forms.gle/e5mQpzDR9epjdneK6 अथवा प्रत्यक्ष महाविद्यालयात अशा पध्दतीने नोंदणी करु शकतात. तरी विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन ऍडमिशन डीन प्रवीण देसाई यांनी केले यावेळी प्राचार्य डॉ.सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील व ऍडमिशन समन्वयक उपस्थित होते.