कोल्हापूर (प्रतिनिधी) : सार्थक आर्ट, सोशल अँड कल्चरल फौंडेशन निर्मित राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रामधील काही प्रसंगावर आधारीत राजर्षी शाहू गाथा या लघु नाट्याचे सादरीकरण (दि. 2६) जून रोजी यु ट्यूब आणि फेसबुकद्वारे होणार आहे. तसेच हा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रसारित केला जाणार आहे.

या लघुनाटिकेचे लेखन युवराज पाटील यांनी केले असून याचे दिग्दर्शन स्नेहलराज संकपाळ यांनी केले आहे. तर याचे चित्रीकरण शैलेश शिंदे यांनी केले आहे. या लघुनाट्य कोल्हापूरच्या कलाकारांनी साकारले आहे. यावेळी सार्थक आर्टचे अध्यक्ष सागर बगाडे, अमित पाटील, रोहित पाटील सोनाली राजपूत, दिग्विजय कालेकर, सुमित साळुंखे, ओंकार शेटे, महेश बगाडे आदी उपस्थित होते.