कोल्हापूर ( प्रतिनिधी ) माझ्या पत्नीला त्रास देऊ नका असा व्हाईस मेसेज कुटुंबाच्या ग्रुपवर शेअर करत पाचगाव येथील एका युवकाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संतोष बाळासो गाडगीळ (वय 35, रा. पाचगाव ) असे या तरुणाचे नाव असून यामुळे पाचगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संतोष आपल्या घरातून बाहेर पडला तो सायंकाळी बालिंगा पुलाजवळ भोगावती नदीवरील दोनवडी हद्दीत नदीकाठावरून फिरत असल्याचे दिसत होता. मात्र पाचनंतर अचानक गायब झाला. त्याची मोटरसायकल व मोबाईल नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत होता.

बुधवारी सकाळपासून संतोषचे नातेवाईकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या साहाय्याने पाण्यात पुन्हा शोधून सुरू केला. दरम्यान संतोषचा मृतदेह नदी पात्रात आढळला असता यावेळी पाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते.

तर एक हात याच दोरीच्या साहाय्याने बांधून ही दोरी मानेभोवती गुंडाळली होती. यानंतर घेतलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळावरून ही आत्महत्या असल्याची चर्चा होती. याबाबत पोलिस तपास करत असून, थोड्याच दिवसात या प्रकरणाचा उलघडा होईल असे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.