मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत ८ जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

याआधी भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार यांनी आपले उमदेवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –

• मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
• कोल्हापूर – संजय मंडलिक
• शिर्डी – सदाशिव लोखंडे
• बुलढाणा – प्रतापराव जाधव
• हिंगोली – हेमंत पाटील
• मावळ – श्रीरंग बारणे
• रामटेक – राजू पारवे
• हातकणंगले – धैर्यशील माने

यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. ठाण्यावर भाजपने तर नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्याची माहिती आहे.

आत्तापर्यंत कोणी किती उमेदवार जाहीर केले ?
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपने सर्वाधिक २४ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर काँग्रेसने १२, शिवसेना ठाकरे गटाने १७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने २ उमेदवार जाहीर केले आहेत. तर प्रकाश आंबडेकर यांनी ९ उमेदवार जाहीर केले आहेत.