मुंबई – बॉलिवूडची ‘ढिंनचॅक लेडी’ म्हणून विद्या बालनला ओळखले जाते. विद्या बालन आपल्या बोल्ड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. विद्या बालनचे चाहते खूप मोठ्या संख्येने आहेत. विद्याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. कहाणी, द डर्टी पिक्चर, भूलभूलैया, मिशन मंगल अशा अनेक सिनेमामध्ये तिने काम केलं आहे. विद्या आपल्या प्रत्येक सिनेमामध्ये वेग वेगळी भूमिका साकारतात पाहायला मिळते. तिने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात विशेष जागा निर्माण केली आहे. विद्या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. आज ती अशाच वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. नुकताच एका मुलाखतीत राजकारणाविषयी एक वक्तव्य केले आहे. तिचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

काय म्हणाली राजकारणाविषयी नेमकं विद्या..?

विद्या म्हणाली, मला राजकारणाची खूप भीती वाटते. आम्ही काही बोललो आणि त्यावरून तुम्ही आम्हाला बॅन वगैरे केलात तर? सुदैवाने माझ्यासोबत असं काही घडलं नाही. पण आता कलाकार राजकारणावर बोलण्यास घाबरतात, कारण कधी कोणाचं मन दुखावेल हे सांगता येत नाही. खासकरून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी तर नाहीच. कारण त्यामागे 200 लोकांची मेहनत असते आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरायला नको. त्यामुळे मी राजकारणापासून लांबच राहते”, असं तिने स्पष्ट केलं.

विद्या पुढे म्हणाली, गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांविरोधात बहिष्काराची मोहीम चालवण्यात आली. चित्रपटातील एखाद्या कलाकाराने राजकीय भूमिका घेतल्यास, त्यावरून नेटकऱ्यांनी थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. याचाच संदर्भ देत विद्याने राजकीय मत व्यक्त करण्यास नकार दिला. आपल्या वक्तव्याचा अर्थ कसा काढला जाईल आणि त्यावरून कशी ट्रोलिंग होईल, हे सांगता येत नाही, असं ती म्हणाली.

विद्याच्या ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये तिने प्रतिक गांधीसोबत स्क्रिन शेअर केला आहे. तर इलियाना डीक्रूज़ और सेंथिल राममूर्ति हे सहकलाकार म्हणून काम करत आहेत. शीर्षा गुहा ठाकुरता हिने या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे.