बारामती – सध्या देशात लोकसभेचं वार वाहत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण जसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे, तसा तापत चालला आहे. विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. अशातच आता राज्यच लक्ष ज्या मतदान केंद्रावर आहे ते मतदान केंद म्हणजे बारामती मतदान केंद्र. बारामतीमधुन अजित पवार गटातून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची लढत लोकसभा रिंगणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पवार- पवार कुटुंबीयामधील मतभेत आता लोकसभेच्या रिंगणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पवार – पवारांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिले आहे. अशातच पुतण्या काकांचा कोल्ड वॉर सध्या पाहायला मिळत आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार याचे नातू रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वी शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवार यांना वाटत असेल तर त्यांचा हा विचार हास्यास्पद आहे, असे वक्तव्य करत रोहित पवारांनी खोचक टोला अजित अजित पवारांना लगावला आहे .

काय म्हणाले रोहित पवार ..?

रोहित पवार म्हणाले , बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वी शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवार यांना वाटत असेल तर त्यांचा हा विचार हास्यास्पद आहे, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. शरद पवार यांनी गेल्या 20 दिवसांमध्ये 52 सभा घेतल्या आहेत. कधी कधी तर त्यांनी एका दिवसात तीन सभा घेतल्या आहेत, दिवसाला 25 बैठका घेतल्या आहेत. या काळात त्यांनी फक्त चार तासांची झोप मिळायची, ते ८४ वर्षांचे आहेत. याउलट अजित पवार कुठे होते तर सोसासटी, गल्ली आणि गावांमध्ये. त्याठिकाणी अजितदादांना कदाचित आरामही मिळाला असेल. पण शरद पवारांना कुठे आराम मिळाला? त्यामुळे शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवारांना वाटत असेल तर त्यांचा विचार हास्यास्पद आहे. हे बदललेले अजित पवार कोणालाही ओळखू न येणारे आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.

रोहित पवार पुढे म्हणाले, अजित पवार सतत विकासाच्या बाता करतात. पण विकास कोणी केला? 2014 पर्यंत जर शरद पवारांनी सत्ताच मिळवून दिली नसती तर अजित पवारांना पद कसं मिळालं असतं, मग त्यांनी विकास कसा केला असता? त्यामुळे विकास कोणी केला, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आता दादांना अहंकार आणि मीपणा आला आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.