कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऋतुजा मांडवकर यांना दक्षिण कोरियातील काँग ऊन विद्यापीठाने इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगमधील पीएचडी पदवी देऊन गौरविले आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे झालेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ही पदवी देण्यात आली.

ऋतुजा यांनी ‘सिनर्जेटिक हायब्रीडायझेशन ऑफ व्हेरियस मटेरियल फॉर इम्प्रुड फोटोकॅरियर इंजेक्शन इन फोटो डिटेक्शन सरफेस इन्हान्स रामन स्पेक्ट्रोस्कोपी’ या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला होता. त्यांना प्रो.जी. हुन लि यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स विभागात झाले आहे.