कोल्हापूर (प्रतिनिधी) : ताराबाई पार्कातील मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातर्फे दर महिन्याच्या १ तारखेला ३० दिवसांचे कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी दर महिन्याच्या २५ ते ३० तारखेपर्यंत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ०२३१- २६५१७२९ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. शिवाय याच केंद्रातील कुक्कूटखत पंधराशे रूपये प्रतिटन या दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.