बारामती : बारामती लोकसभेच्या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्र पवार यांना निवडून आणण्यासाठी चांग बाधलेला आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी पायल भिंगरी बांधली आहे. तर काही ठिकाणी सभेदरम्यान अजित पवार ही कार्यकर्त्यांना दम भरताना दिसत आहेत. शनिवारी बारामतीतील सभेत बोलतांना अजित पवारांनी चार जुननंतर सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरलेल्या पवार कुटुंबातील कोणत्यही व्यक्ती दिसणार नाहीत, जर दिसल्या तर आपण मिशा काढू अस जाहीर सभेत म्हटल होतं. यावर अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत बोलतांना पुन्हा एकदा टीका केली. तसेच त्यांनी सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर शरसंधान साधले होते. सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार यांनी म्हटले होते. यावर आता अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य श्रीनिवास पवार यांनी केले आहे.

ते म्हणाले , 4 जूनला निकाल लागल्यानंतर अजित पवार यांना मिशा काढाव्या लागतील. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले.