मुंबई/प्रतिनिधी : पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्‍मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या न्याय व विशेष साहाय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे. यानंतर रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायलयात धाव घेऊन तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे बर्वे यांच्या निवडणूक लढण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.

तर, ज्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र दिले, तेच अधिकारी प्रमाणपत्र अवैध कसे ठरवू शकतात, असा सवाल रश्‍मी बर्वे यांनी केला आहे. या विरोधात सध्या त्यांची न्यायालयात धावपळ सुरू आहे. अर्ज छाननीची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे. त्यापूर्वी रश्‍मी बर्वे यांना दिलासा मिळाला तर ठीक, नाही तर त्यांना ही निवडणूक लढण्यापासून मुकावे लागणार आहे. छाननीच्या वेळेपूर्वी बर्वे यांच्याकडून काही हालचाल न झाल्यास त्या या निवडणुकीत अपात्र ठरणार आहेत.
या सर्व प्रक्रियेमध्ये जातपडताळणी समितीचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. पण राज्य सरकारच्या न्याय व विशेष साहाय विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांनी उच्च नायालयात धाव घेऊन याप्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी गेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, छाननीमध्ये अर्ज वैध न ठरल्यास उमेदवारीचा दावा राहात नाही. डमी उमेदवार म्हणून रश्‍मी यांचे पती श्‍यामकुमार बर्वे यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. रश्‍मी बर्वे यांचा अर्ज अवैध ठरल्यास श्‍यामकुमार ही निवडणूक लढतील, असे सांगितले जात आहे. पक्षाचा एबी फॉर्मही त्यांनी जोडलेला आहे.

रश्‍मी बर्वे यांचा अर्ज वैध ठरणार नाही, असे काँग्रेस नेते आणि २०१९ मध्ये रामटेकमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढलेले आणि पराभूत झालेले उमेदवार किशोर गजभिये यांनी आधीच सांगितले होते. त्यांनी प्रयत्न करूनही त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. इकडे रश्‍मी बर्वे किंवा त्यांचे पती श्‍यामकुमार बर्वे दोघांचेही अर्ज अवैध ठरल्यास काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी काँग्रेस किशोर गजभियेंना केवळ पाठिंबा देऊ शकेल. पंजा चिन्हावर गजभिये यांची लढण्याची शक्यता नाही.