मुंबई सध्या लोकसभेचे पडघम राज्यात वाजत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आलेत. यात विरोधी पक्ष नेते एकमेकांवर निशाणा साधनांच्या कोणताही मौका सोडत नसल्याचं पाहायला मिळाले. अशातच पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागलेली आहे राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार..?

विजय वडेट्टीवार म्हणाले की , राज ठाकरे दिल्लीसमोर झुकणार नाही अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे. राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला आहे . ते पुढे असेही म्हणाले की, राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाही असे सांगत होते पण त्यांना दिल्लीची वारी करावी लागली यात कुठेतरी राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम आणि त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचा काम होत आहे का? अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

तर राज ठाकरेंची आजची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्याविरोधात नसेल, असा कयास आहे. राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे. म्हणून आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले, दिल्लीश्वरा पुढे झुकणारे नसेल असे वाटते, असं वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका व्यक्त केली.