सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील कोटेश्वर विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे कार्यकर्ते रघुनाथ बाबुराव वरुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभाग्रहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. अध्यक्षस्थानी सहकारी अधिकारी एन.ए.माने होते.

वरुटे शाहू गूळ खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष आहेत. तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.  करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.