कोल्हापूर (प्रतिनिधी) : यादवनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी काही तरुणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये काही घरे आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये झालेली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, यादवनगर येथील दोन तरुणांच्या गटामध्ये पूर्ववैमनस्य आहे. त्यातून आज (गुरुवार) पुन्हा दोन गटात राडा झाला. सायंकाळी यांच्यामध्ये झालेल्या हल्ल्यात काही घरे आणि वाहनांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.