कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने विना मास्क फिरणाऱ्या १५ जणांकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आजअखेर १३३१ व्यक्तींकडून १ लाख ३९ हजार १८० रुपये दंडाची वसुली केली आहे.

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासंबंधी प्रशासन सातत्याने जागृती करीत आहे. तरीही काही जण विनामास्क फिरताना दिसत आहेत. त्यांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासन आणि पोलिसांतर्फे रोज दंडात्मक कारवाई केली जात आहे.