मुंबई,  (प्रतिनिधी ) : राज्यातील  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नांवे आज (सोमवार) जाहीर केली आहेत. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने उमेदवारी  दिली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये झालेल्या बैठकीत  या नावांवर शिक्कामोर्तब केले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट दिले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे.