मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरु आहे. आतापर्यंत तीन टप्प्याच मतदान पार पडलय. अजून चार टप्पे बाकी आहेत. सर्व देशवासीयांच्या नजरा मतदानावर आहेत. अशातच शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी एक मोठा खुलासा केला आहे. येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेना मोठ उधाण आले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय, बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल असे ते म्हणाले आता यावर काँग्रेस परदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांना टोला लगावला.

काय म्हणाले नाना पटोले

नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, काही दिवसात शरद पवार हे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. मात्र त्यावेळेस भाजप कुठे असणार?, असा सवाल करत नाना पटोलेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते नंदुरबारमध्ये बोलत होते. त्यानंतर नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला म्हणाले, बारामतीत अजित पवार गटाच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला दिला आहेत. त्यामुळे अजित पवार हे तानाशाही सोबत आहेत म्हणून या तक्रारी झालेल्या आहेत. दत्तामामा भरणे यांनी कार्यकर्त्यांची ज्या पद्धतीने बोलले आहेत ते तानाशाही पद्धतीने ते बोलत होते. नरेंद्र मोदीच्या थोडाफार गुण अजित पवार गटात आलेला आहे. त्याच्याच एक चित्र काल आपल्याला दिसला आहे, असंही नाना पटोले म्हणालेत. आता यावर महायुतीचे बडे नेते काय प्रतिउत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.