कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवत दोघा भामट्यांनी निवृत्त प्राचार्याकडील ५० हजारांची रोकड, सोन्याची चैन आणि अंगठी असा सुमारे १ लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भगवान भैरु चौगुले (वय ७४, रा. हिम्मत बहादुर, ताराबाई पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भगवान चौगुले यांचे मित्र मोहन पाटील यांना ५० हजार उसने देण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते ताराबाई पार्क येथून पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांच्या समोरून मोटरसायकलवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने भगवान चौगुले यांना रस्त्यात थांबवत, आपण पोलीस अधिकारी आहे असे भासवत, या परिसरातील एका घरात स्मगलिंग माल सापडला आहे. त्यामुळे आम्ही चौकशी करत आहोत असे सांगितले. चौगुले यांना बोलण्यामध्ये गुंतवत चौगुले याच्या बॅगतील ५० हजारांची रोखड, गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन व एक तोळ्याची अंगठी, असा सुमारे १ लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चौगुले यांनी त्या दोघा भामटयांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.