कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरातील सायबर चौक येथे व्हिजन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने कोव्हिड सेंटर सुरु केले आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये कुठलीही अपेक्षा न बाळगता येथे रुग्णांना आधार आणि उपचार केले जात आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पाचगांव येथील तरुणांनी व्हिजनचे अध्यक्ष संताजी घोरपडे आणि डॉ. संगीता निंबाळकर यांचा संयोग काकतकर, अमेय निकम, पृथ्वीराज पाटील, आयेशा नदाफ यांनी केला.