टोप (प्रतिनिधी) : काही दिवसापूर्वी शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी चिंतामणी संजय मडिवाळ (रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) यांचे चारचाकी गाडी खरेदीसाठी आणलेले ७० हजार रुपये असलेली पिशवी चोरट्यांनी पळवून नेली होती. हे तीन चोरटे पल्सर मोटर सायकल पसार झाले होते.
पोलीसांनी फिर्यादीकडून प्राप्त आरोपीचे मोबाईल नंबरचे लोकेशन घेऊन तपासासाठी एक टीम बेळगाव येथे पाठवून सापळा रचून कमरुद्दिन नुर अहमद तिगडोळ्ळी (वय २५, रा. गडकरी गल्ली, कित्तूर, जि. बेळगाव), रियाज बाबुसाब बुड्डणवार (वय २९), अब्दुल लतिफ मोहम्मद गौस तिगडोळ्ळी (वय २६) या तिघांना बेळगाव येथे ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली ७० हजार आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त केली आहे.
ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी किरण भोसले, अतुल लोखंडे, रमेश ठाणेक आदींनी केली आहे.