नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दहशतवादी रशीद लतीफ भारतातही मोस्ट वॉन्टेड होता.

भारत सरकारने त्याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता. एनआयएने त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 2016 मध्ये जैशच्या दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या एअरबेसवर हल्ला केला होता. यामध्ये सात जवान शहीद झाले.

पाकिस्तानी मीडियानुसार, सियालकोटच्या बाहेरील मशिदीत दहशतवादी शाहिदची हत्या करण्यात आली. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि गोळीबार करून पळून गेले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

मसूद अझहरच्या सांगण्यावरून पठाणकोट हल्ल्याची योजना

पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 72 तासांची कारवाई सुरू होती. यामध्ये चार दहशतवादी मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला होता. तपासाअंती शाहीद लतीफने त्या दहशतवाद्यांना शस्त्रे आणि इतर मदत केल्याचे निष्पन्न झाले.

लतीफला 1996 मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकही झाली होती. तो जैशचा दहशतवादी होता. मौलाना मसूद अझहरच्या सांगण्यावरून त्याने पठाणकोटमध्ये हल्ला करण्याची योजना तयार केली होती.