पंढरपूर (प्रतिनिधी) : मौज आंबे चिंचोली येथे दगडाने मारल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याचीमाहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तपासचक्रे फिरवून अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणपत बबन जाधव (रा. कार्ला, ता. मावळ, जि. पुणे, सध्या रा. भीमा नदीपात्र बठाण, ता. मंगळवेढा) यांना सागर वाघमारेने घरी न सोडल्याचा राग मनात ठेवून दगडाने मारहाण केली होती. याचा राग जाधव याला होता. मंगळवारी रात्री सातच्या सुमरास आता मी तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जाधव याने सागर याच्या डोक्यात, तोंडावर आणि कानावर कुऱ्हाडीने मारहाण केली.

तसेच कुऱ्हाडीच्या दांडक्याने गळ्यावर, छातीवर, मांडीवर मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून ठार मारल्याची फिर्याद मयत वाघमारे यांची पत्नी सविता सागर वाघमारे (वय 24) यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. तत्काळ पोलिस निरिक्षक मुजावर यांनी तपासचक्रे फिरवली. यावेळी जाधव पळून जाण्याचा मार्गावर असताना त्याला पकडले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधिक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलिस अधिकारी देवकर, विक्रम वडणे, दत्तात्रय तोंडले, गजानन माळी, अंगत नलावडे, दीपक भोसले यांनी केली आहे.