कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, भारत सरकार आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनुसूचित जमातीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान’ या विषयावर गुरुवार, दि. १५सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे भूषवणार आहेत, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या वंदना केंगले-साबळे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे दिलीप पवार यांच्यासह शामलाल कॉलेज, दिल्ली विद्यापीठ येथील प्रा. विवेकानंद नर्तम यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती कार्यशाळेचे संयोजक डॉ. प्रमोद पांडव यांनी दिली आहे.