मुंबई (प्रतिनिधी) : मला ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे दोषींना शिक्षा झाली पाहीजे. तसेच युवकांना नशेच्या जाळ्याच ढकलणाऱ्यांना रोखण्यासाठी मी एनसीबी अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावर कारवाई करण्याचे मला अधिकाऱ्यांनी सांगितले. या पलिकडे या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असा खुलासा मनिष भानुषाली यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मनिष भानुशाली म्हणाले की, आमचा या कारवाईत सहभाग नव्हता, ही पूर्ण कारवाई एनसीबीने केली आहे. आम्हाला साक्ष नोंदवायची होती म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही त्यांना पकडलेले नाही. देशहिताचे जे काम आहे, ते आम्ही केले. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपामध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही.

दरम्यान, मनिष भानुषाली हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत. ते एनसीबीच्या कारवाईदरम्यान आर्यन खान, अरबाज मर्चंटला घेऊन जाताना दिसले आहेत. मनिष भानुशाली यांचे फोटो पंतप्रधान मोदी आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एनसीबीचे भानुशाली यांच्यासोबत काय संबंध आहेत ?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.