कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रा. सर्जेराव राऊत यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी सर्जेराव ‘राऊत’ या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सुरु केलेला दररोज एक विचार हा उपक्रम मार्गदर्शक असल्याचे प्रा. भारत खराटे यांनी सांगितले.

प्रा. खराटे म्हणाले की, प्रा. सर्जेराव राऊत हे चाटे शिक्षण समूहामध्ये शैक्षणिक विभागप्रमुख म्हणून काम करतात. ते गणिताचे व्यासंगी शिक्षक असून आतापर्यंत आदर्श शिक्षक, शिक्षणरत्न, नेशन बिल्डर अॅवार्ड, गरुड झेप असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कोरोनाच्या काळात विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यात येत नाही. यासाठी त्यांनी यु ट्यूबच्या माध्यमातून दररोज एक विचार विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. एकही दिवसाचा खंड न पाडता आजपर्यंत ५३१ व्हिडीओच्या माध्यमातून हा विचार प्रसारीत केला. या उपक्रमाचा फायदा आपल्या होत असल्याचे पालक सांगतात.

तसेच या उपक्रमातून अनेक विद्यार्थी पालकांनी बौद्धीक विचार देऊन सकारात्मक वातावरण निर्मितीचा संकल्प केला आहे. तर या उपक्रमासाठी मा.प्रा. गोपीचंद चाटे सर, प्रा. डॉ. भारत खराटे आणि सहकारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रा. सर्जेराव राऊत यांनी सांगितले.