कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने छ. शिवाजी चौकात आज (गुरुवार) संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी संविधानाचे मूल्य रुजविण्यासाठी ‘आप’ कटिबद्ध असल्याचे पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी यावेळी सांगितले.

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, बसवराज हदीमनी, भिकाजी कांबळे, हरी कांबळे, गणेश सकटे, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.