सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे पोषण महाअभियान उपक्रम राबविण्यात आला. या अभियानाअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर स्त्रिया, परिसर स्वच्छता, सकस आहाराचे महत्व, तसेच ० ते ३ वर्ष मुलांना द्यावयाचा खाऊ, याचे पालकांच्या मोबाईलवर माहिती व्हॉट्सअॅप वरुन दिली जाते. या काळात विविध प्रकारच्या चारोळ्या आणि फलक घेऊन रॅलीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहचवली जाते. यावेळी सुपरवायझर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, तसेच आरोग्य सेविका आणि कर्मचारी उपस्थित होत्या.