मुंबई (प्रतिनिधी) :  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम आणि बँक सर्व्हिसच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे आता एटीएम आणि बँकेच्या ब्रँचमधून पैसे काढल्यावर सर्व्हिस चार्जमध्ये बदल केले आहेत. चेकबुक, पैसे ट्रान्सफर आणि इतर नॉन फायनान्सशीयल देवाण-घेवाणीवर अधिक चार्जेस लागू करण्यात आले. हे सर्व नियम १ जुलैपासून लागू होणार आहेत.  

एसबीआयच्या ग्राहकाला चारवेळा पैसे काढण्यासाठी मोफत आहे. मात्र फ्री लिमिट संपल्यानंतर बँक ग्राहकांकडून काही अधिकचे पैसे आकारणार आहे. १ जुलैनंतर एटीएममधून रोख रक्कम काढल्यानंतर १५ रुपयांसोबत जीएसटी चार्ज देखील लागू होणार आहे. तसेच कोरोनाच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांना दिलासा देण्याकरता रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

ग्राहक आपल्या बचतखात्यामधून दुसऱ्या ब्रँचमध्ये जाऊन रोख रक्कम विड्रॉल फॉर्म भरून २५ हजार रुपयांपर्यंत काढू शकतात. आणि चेकमधून दुसऱ्या ब्रांचमधून १ लाख रुपये काढण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता एसबीआयच्या एटीएम ग्राहकांना याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.