मुंबई : आयकर विभागाने अनिल अंबानी यांना त्यांच्या अघोषित ४२० कोटींच्या करचोरी प्रकरणी आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक दिवाळखोरीची टांगती तलवार लटकत असताना आता काळा पैसा कायद्यांतर्गत अनिल अंबानींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अनिल अंबानी यांनी जाणीपूर्वक करचोरी केली असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. अनिल अंबानी यांनी परदेशी बॅंकेत असलेल्या खात्यातील रकमेची माहिती आयकर अथवा संबंधित विभागांना दिली आहे. याच प्रकरणी अनिल अंबानी यांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कारणे दाखवा नोटीस बजवाण्यात आली होती. अनिल अंबानी यांच्याविरोधात ब्लॅक मनी इम्पोजिशन ऑफ टॅक्स अॅक्ट २०१५ तील कलम ५० आणि ५१ नुसार खटला चालवण्यात येऊ शकतो. या कलमानुसार दंडासह १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

आयकर विभागाने बजावलेल्या नोटिसीत ३१ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. आयकर विभागाच्या नोटिसीनुसार अंबानी हे बहामास येथील डायमंड ट्रस्ट आणि नॉदर्न अटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड कंपनीचे इकॉनॉमिक कंट्रिब्युटर आणि बेनेफिशियल ऑनर आहेत.